लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.
Showing posts with label माझ्या कॉलेजच्या आठवणी. Show all posts
Showing posts with label माझ्या कॉलेजच्या आठवणी. Show all posts

Monday, 14 February 2022

नावं तिचं आठवण...


कॉलेजमध्ये असताना माझा स्वभाव भावनात्मक होता, आताही आहेच. मन कोमल होतं. पण, प्रेमात कधी चमकलचं नाही माझं भाग्य श्रीदेवीपेक्षाही सुंदर वाटायची ती. माझ्या डोळ्यातली तीच होती रोहिणी का असं केलं असेल तिने तिलाच माहीत. कधीकाळी आशेचा किरण दिसला होता, तोही आता प्रखर सूर्यप्रकाशात लुप्त झाला. बाकी वेळ मिळाला की, तिच्या सोबतच मनसोक्त बोलतो, नावं तिचं आठवण...

Thursday, 23 September 2021

पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण...

पोस्ट ग्रॅज्युएट झालो, पण...


आज पोस्ट ग्रॅज्युएट झालो!!! मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी "मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम"(#एमएसीजे) उत्तीर्ण झालो. ६ जुलै २०१९ ला बॅचलर ऑफ मास मीडिया (#BMM) आणि आज २२ सप्टेंबर २०२१ रोजी (#MACJ) उत्तीर्ण झालो होतो. आनंद नक्कीच आहे. पण, जेवढा आनंद १२ वी पास झाल्यावर किंवा पदवीधर झाल्यावर झाला होता तेवढा आनंद यंदा नाही. त्याची अनेक कारणं आहेत. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं आणि ऑनलाईनच परीक्षा द्याव्या लागल्या हे त्याचं मुख्य कारण... त्यामुळे यंदा पोस्ट ग्रॅज्युएट होऊनही काही विशेष केलं असं वाटलं नाही. निकाल 'हाच' असेल याचा अंदाज होताच. कारण MCQ पद्धतीनं ५० पैकी ४० प्रश्न सोडवणं तेही (अभ्यासासाठी?) दिलेल्या प्रश्नावलीतून हे अगदी १२ वी च्या विद्यार्थ्यालाही जमेल असं होतं. विजयाची माळ कष्ट न करता गळ्यात पडावी असं वाटतंय. पण असो... आता मी पदव्युत्तर पदवीधारक आहे हे मला मान्य करावं लागेल.

बाकी मी या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात काय शिकलोय हे मला फारसं आता सांगता येणार नाही. कोरोनाने नको त्यांची चांदी केली, पण आमची मात्र मजा घालवली. कॉलेजला जाण्याची मजा, नवीन मित्र-मैत्रीणी जोडण्याचा तो काळ, वर्गात बाकावर बसून शिकण्याचा तो आनंद, कॉलेज डेज आणि एकुणच अख्खी कॉलेज लाईफ या कोरोनाने हिरावून घेतली. नशीबी आलं ते कृत्रीम, व्हर्चुअल आणि ऑनलाईन जग. एकेकाळी स्मार्टफोनमध्ये तासन्-तास रमणारा मी आता या नकली ऑनलाईन जगताला खरंच वैतागलो आहे.

मला एसएसटी कॉलेजचे ते सुंदर दिवस आठवतात, जेव्हा मी रीअल कॉलेज लाईफ मनसोक्तपणे जगली होती. किती नवे मित्र, नव्या मैत्रिणी, शिक्षक अशा सर्वांशीच अगदी दिलखुलास संबंध होते. कॉलेजमध्ये थोडीफार हवा होती. पण, नंतर मास्टर्ससाठी जोशी-बेडेकर कॉलेजला आल्यावर फक्त पहिली सेमीस्टर लिखीत दिली, त्यातही खूप कमी वेळा कॉलेजला गेलो होतो त्यामुळे क्लासमेटही मला ओळखत नाही याबद्दल जरा वाईट वाटतं. कारण मला मित्र-मैत्रिणी म्हणजे अत्यावश्यक बाब वाटतात. मी घरच्यांच्या नजरेत जरी माणूसघान्या असलो तरी बाहेरच्या दुनियेत माणसाळलेला प्राणी आहे. त्यामुळे बेडेकर कॉलेजमध्ये हे एकटेपण मला सतावत होतं. एकतर मास्टर्स करायचं ठरलं नव्हतं. मग अचानक करावं असं वाटलं आणि अॅडनिमिशन घेतलं, तेही पहिल्या सेमीस्टरच्या एक ते दीड महीने अगोदर... त्यामुळे जरा गडबड झाली होती. त्यात तेव्हा मी काही दिवस ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात काम करत होतो, नतंर माय महानगरमध्ये इंटर्नशीप म्हणून मला कॉलेजला जायला जमलंच नाही. मग जेव्हा कधीतरी जायचो तेव्हा इतरांशीही काही जास्त बोलणं होत नव्हतं त्यामुळे कुणाशी खास अशी मैत्री झालीच नाही. फक्त हाय...हॅलो पुरती मैत्री मला नको वाटते. मग रेग्युलर जाण्याचा विचार केला, तसं प्लॅनिंगही केलं, मग कोरोना महाशयांमुळे लॉकडाऊन झालं ते अदयापही कॉलेज बंदच आहे. अशातच आमची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पुर्ण झाली तेही आजच ऑनलाईन कळलंय. कॉलेज लाईफ जगण्याची इच्छा कोरोनाने हिरावून तर घेतली शिवाय आयुष्यातल्या अनेक चांगल्या क्षणांपासून दुर केलं. असो... आता सगळं झाल्यावर बोलण्यात काही अर्थ नाहीच, पण मन मोकळं करावं म्हणून हे इकडे लिहीलं आहे.

आता अधिकृतपणे कॉलेजलाईफ संपली आणि दुनियादारी सुरु झाली. आता आयुष्यात मित्र-मैत्रिणी, शिक्षक, नोट्स, बेंच यांची जागा सहकारी, संपादक, टास्क, डेस्क यांनी घेतली. अर्थात बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हा बदल माझ्यासाठी सकारात्मकच आहे. पण, कॉलेज लाईफचा असा दी एन्ड झाल्याने आयुष्याशी जरासा नाराज आहे, लवकरच ही नाराजगी दुर होईल... कारण माझी नाराजगी दुर करणारा मी एकटाच आहे...अद्यापही अन् सध्यातरी...! बाकी मी आज पोस्ट ग्रॅजुएट झालो याचा मला नक्कीच आनंद आहे.
एकेकाळी बारावी सायन्समधून नापास झाल्यावर.....बस्स झालं! यावर आता नंतर कधीतरी पकवेन, मला झोप आणि कंटाळा दोन्हीही एकसोबत आल्याने गुडनाईट.....

Tuesday, 25 August 2020

प्रेम कसं होतं? एक आठवण...

     प्रेम कसं होतं?... २५ ऑगस्ट २०१७ ला ही कविता लिहिली होती. तेव्हा मी BMM च्या फर्स्ट ईअरला होतो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं अतिप्रेम झालं की ते प्रेम कागदावर उमटलं. कविता ज्यांना ज्यांना पाठवली सर्वानांच ती आवडली. त्याच वर्षी म्हणजे २०१७ ला मराठी भाषा दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. त्यात अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितेचं वाचन करून त्यांना आदरांजली देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. यावेळी विज्ञान,कला वाणिज्य, पत्रकारिता अशा सर्व शाखेचे जवळपास २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या कवितेचं वाचन झालं. तेव्हा 'BMM मधून कोण नाही का कविता करणारा?'' असं सूत्रसंचालन करणाऱ्या दीपक गवादे सरांनी विचारलं. आम्ही सगळे जण एकमेकांची तोंडं पाहू लागलो. माझी कविता मित्रांना माहित होती. तेवढयात माझा वर्गमित्र प्रसादने नंदू सरांना सांगितलं कि सर अक्षयने लिहिली आहे कविता. मला जाम अवघडल्यासारखं झालं. कारण ती कविता प्रेमावर होती आणि मी इतका लाजरा... त्यात ती सर्वांसमोर वाचायची, सगळे हसणार, मजा घेणार याची मला भीती... नंदू सरांनी मला जा पुढे कविता वाच म्हणून हट्टाने आणि आदेशाने सांगितलं. मी घाबरत घाबरत माझ्या मोबाईलवर माझा ब्लॉग ओपन केला आणि पुढे गेलो... दीपक सरांना विनंती केली कि,  सर मला कविता वाचता येणार नाही प्लीज तुम्हीच वाचा... असं सांगून मी माझा मोबाईल दीपक सरांकडे दिला आणि पटकन माझ्या बेंचवर बसलो. यावेळी माझ्या हृदयाचे ठोके भयंकर वाजत होते. कारण मी कुणावर प्रेम करतो हे या कवितेतून स्पष्ट कळत होतं. 
        तर दीपक सरांकडे मोबाईल दिला, त्यांनी माझ्या कवितेचं नाव वाचूनच कवितेचा आशय समजून घेतला. आणि जसं कवितेचं नाव वाचलं तसं सर्वजण ओ... म्हणून दाद देऊ लागले. दीपक सर भाषेचे शिक्षक असल्याने त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि कवितेचं वाचन कौशल्य खरंच अप्रतिम आहे. जेव्हा दीपक सरांनी कवितेचं वाचन सुरु केलं तेव्हा प्रत्येक ओळीवर सर्वजण दाद देत होते, हसत होते, माझ्याकडे बघत होते आणि मी मात्र खूपच नर्व्हस होतो. कारण ती कविता म्हणजे तिला जाहीररीत्या प्रपोजच होता. बोल दीपक सरांचे आणि शब्द माझे. माझ्या कवितेचं रसग्रहण आणि सादरीकरण ज्याप्रकारे दीपक सरांनी केलं ते खूप अप्रतिम होत. प्रत्येकाला ही कविता रिलेट करत होती. थेट हृदयातून आलेल्या या कवितेत माझ्या १००% खऱ्या आणि निखळ भावना होत्या. कवितेच्या शेवटच्या कडव्यात एक ओळ होती ज्यामुळे सर्वजण खळखळून हसले ती ओळ अशी -  ''प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.'' बालिश वाटते ना? मलाही आता वाटते. पण तेव्हा हीच फीलिंग होती. आता कळतंय आपण किती बालिश होतो ते... पण काहीही असो जे वाटलं ते लिहिलं... माझ्या कवितेने कार्यक्रमाचा शेवट झाला. आणि निघताना मला सगळेजण दाद देत होते, तारीफ करत होते, अभिंनदन करत होते... मी फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरचे सिनिअर विदयार्थीं मला अभिनंदन करायला आले. दीपक सरांनी तर माझं कौतुक केलं. कारण पत्रकारितेचा विदयार्थी म्हणून माझा स्वतःचा ब्लॉग आहे आणि मी काहीतरी लिहितोय यामुळे त्यांनी मला शाबासकी दिली. सोबतच थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना ''शिका काहीतरी यांच्याकडून'' असं म्हणत त्यांना हटकलं. सरांनी केलेल्या कवितेच्या वाचनामुळे मला कॉलेजात जरा वेगळी ओळख मिळाली आणि मी काही दिवसांचा सेलेब्रिटी झालो होतो. पण.... 
       पण... जी कविता सर्वांनां आवडली, जी कविता मी तिला स्वतः पाठवली होती, त्याच मुलीने मला विचारलं... ''अक्षु, कुणासाठी लिहिलीय कविता?'' आईशप्पथ  काळजाची तार छेडणं काय असतं हे त्याक्षणी कळलं. नेमकं ती माझ्या बाजूला बसली होती. बाजूला म्हणजे मुलामुलींचे वेगळे बेंच होते आम्ही दोघे कडेला बसलो होतो, मध्ये गॅप होता. तिच्या बाजूला बसला यावं म्हणून मी मुद्दाम तिकडे बसलो होतो. पण साला तिला खरंच कळलं नाही का? कि ती कविता तिच्यासाठीच होती... कॉलेजात कसं काय टॉप केलं तिने काय माहित? वेडी कुठली... एकतर ती खूप वेडी होती, नाहीतर तिला सगळं कळत असूनही माझी शाळा घेत होती...असो... ते दिवसच वेगळे होते. या कवितेचं वाचन माझी मैत्रीण श्वेता वाळंजने सुद्धा केलाय. आम्ही कल्याणच्या जनशक्ती न्यूजमध्ये सोबत काम करायचो. तेव्हा तिलाही कविता खूप आवडली आणि तिने तर थेट तिच्याच फेसबुकवरून लाईव्ह करत कवितेचं वाचन केलं. त्या व्हिडिओला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही कविता हृदयाच्या खूप जवळ आहे. आज या कवितेला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून ही कविता पुन्हा शेयर करतोय...कशी वाटली सांगा... जमलं तर...आता तर कविता सुचत नाही कारण आता तशा भावनाच येत नाही. त्यामुळे मी ज्या काही मोजक्या ४-५ कविता केल्या आहेत त्याच माझ्या हृदयातल्या आणि मनातल्या गोष्टी आहेत असं समजा...पुन्हा अशा कविता सुचतील कि नाही...माहित नाही. कारण आता प्रेम वैगेरे म्हटलं कि भीती वाटते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि बाकी राहिली शून्य!!! पण बघू ,काय सांगता येत नाही. ये दिल तो बच्चा है जी...😊


मूळ कविता वाचण्यासाठी हृदयावर 💓💓💓💓 क्लिक करा


Tuesday, 2 April 2019

The feelings of Teddy....

     इस टेडीबियर को किसी ने फेंक दिया था... अगर उसमें भावनाएं होती हो उसे कैसा लगता? इसे समझाने के लिए मेरी लिखी एक हुई छोटिसी काल्पनिक कहानी... उम्मीद है आपको पसंद आएगी...😊

Photo: 2nd April 2019, Opp. SST College' fountain
   
     बाजार से उसने मुझे बड़े प्यार से घर लाया। मेरे लिए एक अच्छी सी जगह अपने कमरे  दी। वह मेरे साथ बहुत खेलती थी, मुझसे बातें करती थी और मैं बस खामोश रहकर उसकी बातें सुनता था। मैं उसको कुछ जवाब तो नहीं दे पाता था लेकिन उसको पूरी तरह से महसूस करता था। वह मुझे प्यार से मारती थी मुझे उठाकर पटकती थी मुझे बहुत सताती थी लेकिन बाद में प्यार भी करती थी। और मैं बस उसके प्यार में सब कुछ हंसी खुशी बर्दाश्त करता जाता था। भले ही मेरे में जान नहीं थी, पर इतने दिन साथ रहकर ना जाने कहां से मेरे दिल में उसके लिए प्यार जाग गया। लेकिन क्या करता हूं तो मैं एक खिलौना ही ना। लेकिन फिर मैंने सोचा ठीक है मैं खिलौना हूं, मैं उससे प्यार नहीं कर सकता लेकिन वह तो मुझसे बेइंतहा मोहब्बत करती है। मेरा साथ कभी नहीं छोड़ेगी बस यही सोच कर उसे उसके हमसफर के साथ देख कर मैं अकेला जिए जा रहा था।
     एक दिन अचानक उसको क्या हुआ मुझे पता ही नहीं चला। उसने यह कहकर मुझे कचरे के डब्बे में फेंक दिया कि अब या खिलौना पुराना हो चुका है इसकी हमें कोई जरूरत नहीं। उसकी यह बातें सुनकर मुझे बहुत बड़ा सदमा लगा। की क्या यह वही लड़की है जो मुझसे घंटों तक अकेले में बातें करती थी, जो मुझे गोद में लेकर सोती थी, जो मुझसे सबसे ज्यादा प्यार करती थी, जो मुझसे सारी बातें साझा करती थी, मेरे साथ अपना सुख- दुःख बाटती थी, जो हमेशा मुझे साथ लेकर जाती थी। आज न जाने उसे क्या हो गया की उसने मुझे अपने से इतना दूर कर दिया।
    मैं उससे मैं कह नहीं सकता की मुझे अपने से दूर ना करना भले मुझे किसी कोने में रख देना लेकिन तुम्हारे बगैर मैं जी नहीं सकता। काश काश भगवान इस रूई के खिलौने में कुछ देर के लिए जान भर दे और मैं उसे कह सकू की, मुझे अपने से दूर मत करना। लेकिन मैं कमबख्त मै हूं तो एक निष्प्राण खिलौना, मुझ में इतनी भी शक्ति नहीं कि अपने दुख को व्यक्त करने के लिए आंसू बहा सकू। उसने मुझसे पहले बेइंतहा मोहब्बत की फिर मैं भी उसको अपना दिल दे बैठाऔर अब उसने एक झटके में मुझे अपने से दूर कर दिया। अब मेरे जीने का कोई मतलब नहीं रहा जिसको मैं अपना जीवन समझ रहा था उसी ने मुझे ठुकराया। लेकिन कमबख्त मुझ में इतनी शक्ति भी नहीं कि मैं आत्महत्या कर सकू।   अभी फिलहाल दो दिन से में किसी तालाब में यूहीं पड़ा हूं। ना ठीक से जी पा रहा हूं और ना ही मर रहा हूं बस यूं ही उसकी याद में तड़प रहा हूं। सब कुछ खत्म हो गया है बस एक बार उसे देख कर ना जीवन समाप्त करना चाहता हूं।जाते जाते मैं बस इसी सोच में पड़ा हूं की,  ख़ुदा ने इंसान को बनाया और इंसान ने मुझे बनाया। मुझमें तो प्यार की भावनाएं जाग उठी लेकिन इंसान की भावनाएं क्यों मर रही है। अगर इंसान ऐसा ही होता है तो में शुक्रियादा करता हूं उस खुदा का जिसने मुझमें प्राण नहीं दिए। बस अब उसी ख़ुदा से यही दुआ है कि मेरे अंदर के भावनाओं को भी यमराज के पास बुला ले। क्योंकि जब तक मेरे दिल में लिए प्यार है तब तक मैं ऐसेही तड़पता रहूंगा लेकिन मेरा रूई का बदन देखकर किसी को मेरी तड़प भी नहीं दिखाई देगी।
    ऐ ख़ुदा मुझपे एहसान कर और अपने फरिश्तों को भेजकर मुझे अपने पास बुला ले। और उस लड़की को कुछ मत कहना क्योंकि उसके साथ बिताए हुए वह पल इतने हसीन थे कि मैं वह कभी नहीं भूल सकता। उसे लंबी उमर देना उसे खुश रखना बस यही दुआ है मेरी कि वह जहां भी जाए हमेशा बस मुस्कुराती रहें।
                           - तुम्हारा Teddy🐻

Friday, 11 May 2018

कुणावरतरी प्रेम होणं... आणि ती व्यक्ती आपल्याला नकारच देणार हे माहित असूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करणं...अजबच असते ना ही भावना....

काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



हल्ली खूप बदललोय मी...
स्वतःच जणू स्वतःला विसरलोय मी...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तुझं बोलणं, तुझं वागणं सर्वच मला आवडू लागलंय...
तुला काही फरक नाही पण माझंच सर्व बिनसलंय...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
                                                                                              
                  

तुझं माझ्यापेक्षा इतरांशी जास्त बोलणं...       मला         बघूनही न बघितल्यासारखं करणं...
हे सर्व माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरतंय...
पण काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



तुला मान्य नाही आपलं हे नातं...
हे मला केव्हाच कळलंय...
पण तरीही तुझ्यासाठी हे हृदय खुपवेळा रडलंय...
सर्व काही कळतंय पण  वळत नाही...
तूच सांग...काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
                                                                                            
 
 तुझ्याशी नातं जोडता-जोडता स्वतःचचं स्वतःशी नातं तुटलंय...तुझं प्रेम मिळवता-मिळवता मी स्वतःलाच गमावून बसलोय...कारण, काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!                        



तू मला स्पष्टपणे नाकरलंय...
अन मीही हे कटू सत्य स्वीकारलंय...
पण तरीही काय माहीत अधून-मधून हे  प्रेम कसं उतू जातं?...
असंच असतं का गं....हे एकतर्फी प्रेमाचं नातं?...
तुला नाही फरक पडला काही...पण मला हे सर्व कठीण जातंय... आता  तूच सांग... काय करू?
तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



                                                       -अक्षय बैसाणे.







Monday, 12 February 2018

आपल्या जवळची आणि आपल्याला आवडणारी आपली खास मैत्रीण जेव्हा आपल्यावर रुसते आणि अक्षरशः आपल्याशी बोलणंच बंद करून टाकते... तेव्हा मनाला काय वेदना होत असतील हे मैत्री जाणणाऱ्या तिच्या म्हणजेच रुसलेल्या मुलीच्या खऱ्या मित्रालाच कळेल...एका रुसलेल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काही ओळी सुचल्या त्याच इथे लिहिल्या.. तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी एखादी मस्करी केल्यानंतर ती रुसली असेल तर तिला मनवण्यासाठी तुम्ही माझी कविता वापरू शकता... फक्त माझा ब्लॉग प्रामाणिकपणे तुमच्या फेसबुकआणि व्हाटसअॅपवर शेअर करा...आणि एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारा- ती तुमची नक्की मैत्रीणच आहे ना? कि अजून काही?.....माझी कविता खूपच लहान पण अर्थपूर्ण आणि परिणामकारक आहे... ती आता पुन्हा बोलायला लागली....आणि लक्षात ठेवा कवितेत भावना फार महत्वाची...😉


तिच्याशी छोटीशी मस्करी केली,
अन् तिने माझ्याशी मैत्रीच् तोडली,

माझीच सवय मलाच नडली,

मला चांगलीच अद्दल घडली,
अशी ती अप्रिय घटना घडली,

तेव्हा मला अक्कल आली,

तिने मैत्री तोडून माझीच थट्टा केली,

माझ्या काळजाची तार अशी छेडली,

 Dear,

नाही करणार पुन्हा अशी चुकी,

मनापासून माफी मागतो तुझी,

पण मला पुन्हा हवी मैत्री  तुझी...



                    -अक्षय बैसाणे, तिचा वेडा... मित्र?

Monday, 29 January 2018

मानवी मन ही जगातील सर्वात वेगवान वस्तू असली तरी, ते मन जेव्हा कुणाच्या तरी जाळ्यात अडकतं, तेव्हा ती व्यक्ती खूप बेचैन होते. मन हे मानवी स्वभावावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे मनाला कुणाच्याही जाळ्यात न अडकण्याचा व जपून राहण्याचा सल्ला या काही ओळींमधून देण्यात आलेला आहे. (१४ आॅगस्ट २०१६, रविवार मध्यरात्री ०१:५४ वाजता पूर्ण लिहून झाली).

हे वेड्या मना ...

 हे मन कसं वेडं असतं ना, कुठेही लगेच अडकतं
कुणाच्याही मोह-मायेत पटकन फसतं 
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला
       हे वेड्या मना सांभाळ स्वतःला...     
                         तु आहेस खूप भोळा, दुनिया खूप निर्दयी
काचेप्रमाणे होतील तुझे असंख्य तुकडे
आणि पडशील तू जमिनीवर आडवा
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला
  हे वेड्या मना सांभाळ स्वतःला...
झालंय काय तुला?
तु करतोयस काय?
कुठे आहेस तू नक्की?
तुझं चाललंय तरी काय?
 अडकशील तू जाळ्यात जरा सांभाळून रहा
काळजी घे स्वतःची जप स्वतःला
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला...


                                        -अक्षय बैसाणे.

Tuesday, 23 January 2018

कॉलेजात गेल्यावर केलेली पहिली-वहिली कविता... (१० आॅगस्ट २०१६, बुधवार मध्यरात्री ०१:१५ वाजता पूर्ण झाली.)

प्रेम असतं एक Competition



तिने केलं Congratulations,
तेव्हाच झालं Attraction,
जणू टोचले Love injection
झालं हृद्याचं Submission…


तिच्यासोबत केलेलं Presentation,
होते जणू Celebration
तिच्यासोबाताचे क्षणही होते Meditation,
अजबच असतात ना ते Emotions
तिने केलेल्या Action चेच होते ते Reaction…

मित्रांनी दिलं Suggestion
नको घेउस तिचं Tension,
प्रेम असतं एक Competition
तुझं नाही तेवढं Qualification…

ती नाही देणार तुला Attention
मित्रा नको घेऊस तिचं Tension
कारण, प्रेम असतं एक Competition
प्रेम असतं एक Competition…


                          -अक्षय बैसाणे.






Friday, 25 August 2017

प्रेम कसं होतं?



प्रेम कसं होतं?


 आयुष्यात तिला पहिल्यांदाच पाहिल्यावर जेव्हा हृदय धड-धडतं तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा तिचं नाव ऐकुणच चेहऱ्यावर स्मितहास्य येतं तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा बोलताना आपोआप तिचचं नाव आपल्या तोंडून निघतं तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा तिच्या कोमल हातांचा स्पर्श आपल्याला होतो तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा कारण नसतानाही उगाच तिची काळजी वाटते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती स्वतःहून आपल्याशी बोलायला येते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती तिचं मन आपल्याजवळ हलकं करते तेव्हा प्रेम होतं. 



जेव्हा ती आपल्यावर  उगाच ओरडत नि भांडत असते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती आपलं छानसं आणि गोड नाव ठेवते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती सर्वांसमोर आपल्यालाच हाक मारते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा लेक्चरला असताना पुस्तकात तिचं नाव येत आणि सगळे आपल्याकडेच बघतात तेव्हा प्रेम होतं.

जेव्हा ती कारण नसतानाही आपल्याशी बोलायला येते तेव्हा प्रेम होतं.
प्रेम
प्रेम
प्रेम.
प्रेम, हे असचं होतं. त्याला नसते काळ-वेळ, नसतं कसलचं बंधन. नसतात कुठलेही नियम व अटी, आणि नसतात कुठल्याही जाती-पाती. प्रेमात सर्व काही माफ असतं, आरशासारखं साफ असतं.


         
  प्रेम म्हणजे दोघांनाही जिवंतपणी मिळालेलं स्वर्ग असतं.प्रेम म्हणजे दोघांनाही एकाच वेळी एकसारखं पडलेलं गोड स्वप्न असतं.
प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं
असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.
प्रेम म्हणजे दोन ह्रदय नि एकच जीव
प्रेम म्हणजे दोन शरीर नि एकच आत्मा
असं असतं प्रेम.........



-अक्षय बैसाणे.   

पहिली पोस्ट

  

 नमस्कार मी अक्षय बैसाणे. राहणार--कल्याण(पूर्व) जिल्हा ठाणे-४२१३०६. वय २२ वर्षे. मी SYBMM ला शिकत असून. मी एका स्थानिक वृत्तवाहिनी मध्ये पत्रकार म्हणून नोकरीही करतो. ब्लॉग लिहिण्याचं कारण असं कि, मी माझ्या मनातील भावनांना शब्दांच्या रूपाने वाट मोकळी करून देऊ इच्छितो. बरेच जण बोलतात कि तू खूप छान लिहितोस, ब्लॉग लिहायला चालू कर. मी कितपत चांगलं लिहितो हे मला माहित नाही पण कुठंतरी आपलं तोडकं-मोडकं लिखाण जतन करावं जेणेकरून मला माझं लिखाण वाचून माझी पात्रता कळेल आणि सोबतच त्यात मी सुधारणा करू शकेल हा प्रामाणिक उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून मी हा ब्लॉग सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मन आणि वेळ यांचा समतोल राखून मी ब्लॉगवर पोस्ट टाकत जाणार आहे, त्यामुळे पोस्ट कोणती,कधी, किती,कशी टाकणार याविषयी मीही अनभिज्ञच आहे. पण एवढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो कि माझ्या ब्लॉगवरच्या पोस्ट वाचून मी तुम्हाला आपलासा वाटेल. तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्या लिखाणात तुम्हाला दिसेल. म्हणूनच या ब्लॉगवरील पेज च नाव मी ''मनातल्या गोष्टी'' असं ठेवलंय. 
   या पेजवर मी माझ्या आणि माझ्या आजूबाजूला घडत असणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल थोडं बोलणार असून त्याबद्दल मी माझं मतही मांडणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियाही माझ्या ब्लॉगवर स्वागताहार्य आहेत, त्यामुळे जास्तीत- जास्त प्रतिक्रियांची मला अपेक्षा आहे.(चांगल्या आणि वाईट दोन्हीही) आपणांस आग्रहाची विनंती आहे कि माझ्या पोस्टवर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात. सध्या तरी मी माझी पहिली पोस्ट म्हणून मी लिहिलेली एक कविता ''प्रेम कसं होतं''  आपल्यासमोर प्रसिद्ध करत आहे. मी कवी नाही पण ते म्हणतात  ना 'भावना महत्वाच्या असतात' म्हणून मी माझ्या मनातील भावना लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्यामुळे यमक जुळाले नाही तरी भावना मात्र कळतील.एकूणच या पेजवर तुम्हाला कथा-कविता, विवध विषयांवर लेख-अग्रलेख,ज्ञान-विज्ञान,माहिती-मनोरंजन हे सर्वकाही मिळणार आहे.
   चला  तर मग भेटूयात आपल्या हक्काच्या ब्लॉगवर www.akshaybaisane.blogspot.in वर क्लिक करा.
                                                                                         -अक्षय बैसाणे.

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...