सोसाट्याचा वारा भयंकर वादळाचा इशारा देतो,
पण क्षणभर का होईना गारवा मात्र देतो...
आपल्या आयुष्यात अनेक वादळं येतात,
पण त्याआधी थोडा गारवा मात्र देतात...
याच क्षणभर मिळालेल्या गारव्यात तृप्त व्हायला हवं,
अन् मग पुढे येणाऱ्या वादळाशी लढायला हवं...
वादळ येईल, सर्व उध्वस्त करुन जाईल
आपण मात्र पुन्हा उठायला हवं,
स्वतःला सावरुन दुसऱ्यालाही उठवायला हवं...
वादळ कधी सारखं नसतं
ते रूप बदलून येत असतं
आपण त्याला घाबरायचं नसतं
मात्र स्वतःची काळजी घेऊन दुराऱ्याला वाचवायचं असतं...
महामारीच्या या वादळात स्वतःची काळजी घ्यायला हवी,
मात्र दुसऱ्यांचीही विचारपूस करायला हवी...
शक्य ती मदत करायला हवी,
अन् या भयंकर वादळात माणुसकीची ज्योत प्रज्वलित ठेवायला हवी...
No comments:
Post a Comment