नमस्कार मी अक्षय बैसाणे. राहणार--कल्याण(पूर्व) जिल्हा ठाणे-४२१३०६. वय २२ वर्षे. मी SYBMM ला शिकत असून. मी एका स्थानिक वृत्तवाहिनी मध्ये पत्रकार म्हणून नोकरीही करतो. ब्लॉग लिहिण्याचं कारण असं कि, मी माझ्या मनातील भावनांना शब्दांच्या रूपाने वाट मोकळी करून देऊ इच्छितो. बरेच जण बोलतात कि तू खूप छान लिहितोस, ब्लॉग लिहायला चालू कर. मी कितपत चांगलं लिहितो हे मला माहित नाही पण कुठंतरी आपलं तोडकं-मोडकं लिखाण जतन करावं जेणेकरून मला माझं लिखाण वाचून माझी पात्रता कळेल आणि सोबतच त्यात मी सुधारणा करू शकेल हा प्रामाणिक उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून मी हा ब्लॉग सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मन आणि वेळ यांचा समतोल राखून मी ब्लॉगवर पोस्ट टाकत जाणार आहे, त्यामुळे पोस्ट कोणती,कधी, किती,कशी टाकणार याविषयी मीही अनभिज्ञच आहे. पण एवढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो कि माझ्या ब्लॉगवरच्या पोस्ट वाचून मी तुम्हाला आपलासा वाटेल. तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्या लिखाणात तुम्हाला दिसेल. म्हणूनच या ब्लॉगवरील पेज च नाव मी ''मनातल्या गोष्टी'' असं ठेवलंय.
या पेजवर मी माझ्या आणि माझ्या आजूबाजूला घडत असणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल थोडं बोलणार असून त्याबद्दल मी माझं मतही मांडणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियाही माझ्या ब्लॉगवर स्वागताहार्य आहेत, त्यामुळे जास्तीत- जास्त प्रतिक्रियांची मला अपेक्षा आहे.(चांगल्या आणि वाईट दोन्हीही) आपणांस आग्रहाची विनंती आहे कि माझ्या पोस्टवर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात. सध्या तरी मी माझी पहिली पोस्ट म्हणून मी लिहिलेली एक कविता ''प्रेम कसं होतं'' आपल्यासमोर प्रसिद्ध करत आहे. मी कवी नाही पण ते म्हणतात ना 'भावना महत्वाच्या असतात' म्हणून मी माझ्या मनातील भावना लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्यामुळे यमक जुळाले नाही तरी भावना मात्र कळतील.एकूणच या पेजवर तुम्हाला कथा-कविता, विवध विषयांवर लेख-अग्रलेख,ज्ञान-विज्ञान,माहिती-मनोरंजन हे सर्वकाही मिळणार आहे.
चला तर मग भेटूयात आपल्या हक्काच्या ब्लॉगवर www.akshaybaisane.blogspot.in वर क्लिक करा.
-अक्षय बैसाणे.
Nice one bro 👌
ReplyDeleteAwesome....
ReplyDeleteMast ..!👍
ReplyDeletekhup chan bhava . lage raho . ALWAYS SUPPORT
ReplyDelete