काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
स्वतःच जणू स्वतःला विसरलोय मी...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तुझं बोलणं, तुझं वागणं सर्वच मला आवडू लागलंय...
तुला काही फरक नाही पण माझंच सर्व बिनसलंय...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तुझं माझ्यापेक्षा इतरांशी जास्त बोलणं... मला बघूनही न बघितल्यासारखं करणं...
हे सर्व माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरतंय...
पण काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तुला मान्य नाही आपलं हे नातं...
हे मला केव्हाच कळलंय...
पण तरीही तुझ्यासाठी हे हृदय खुपवेळा रडलंय...
सर्व काही कळतंय पण वळत नाही...
तूच सांग...काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तू मला स्पष्टपणे नाकरलंय...
अन मीही हे कटू सत्य स्वीकारलंय...
पण तरीही काय माहीत अधून-मधून हे प्रेम कसं उतू जातं?...
असंच असतं का गं....हे एकतर्फी प्रेमाचं नातं?...
तुला नाही फरक पडला काही...पण मला हे सर्व कठीण जातंय... आता तूच सांग... काय करू?
तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
-अक्षय बैसाणे.
Kya baaat hai Akshay...
ReplyDelete