लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Tuesday, 2 March 2021

आयशा

Hello... अस-सलामअलैकुम। -मेरा नाम हैं आयशा आरिफ खान। और मैं जो भी कुछ करने जा रही हूं अपनी मर्जी से करना चाहती हूं, इसमें किसी का दौर या दबाव नहीं है। अब बस क्या कहें??? ये समझ लीजिए खुदा की जिंदगी इतनी ही होती है, और मुझे इतनी ही जिंदगी बहुत सुकून वाली मिली। और डियर डैड कब तक लड़ेंगे अपनों से? केस विड्रॉल कर दो... नही करना। ये आयशा लड़ाइयों के लिए नहीं बनी। प्यार करतें है आरिफ से, उसे परेशान थोड़ी न करेंगे, अगर उसे आज़ादी चाहिए... ठीक है वह आज़ाद रहें। चलो... अपनी जिंदगी तो यही तक है। 

मैं खुश हूं कि में अल्लाह से मिलूंगी। उन्हें कहूंगी कि, मेरे से गलती कहा रह गई? मां - बाप बहुत अच्छे मिले, दोस्त भी बहुत अच्छे मिले। पर शायद कहीं कमी रह गई। मुझमें या शायद तकदीर मे। में खुश हूं... सुकून से जाना चाहती हू, अल्लाह से दुआ करती हू कि अब दोबारा इंसानों की शक्ल ना दिखाए।

एक चीज जरूर सीख रही हु। मोहब्बत करनी है तो दो तरफा करो एक तरफा में कुछ हासिल नहीं। चलो कुछ मोहब्बत तो निकाह के बाद में भी अधूरी रहती है। यह प्यारी सी नदी... प्रेय करते हैं कि, यह मुझे अपने आप में समा ले। और मेरे पीठ पीछे जो भी हो, प्लीज ज्यादा बखेड़ा मत करना। मैं हवाओं की तरह हूं... बस बहना चाहती हूं... और बहते रहना चाहती हूं... किसी के लिए नहीं रुकना। 

मैं खुश हूं आज के दिन... की, मुझे जिस सवाल के जवाब चाहिए थे वह मिल गए। और मुझे जिसको जो बताना था सच्चाई वह बता चुकी हूं... बस काफी है... थैंक यू... और मुझे दुवाओं में याद करना... क्या पता जन्नत मिले या ना मिले... चलो, अलविदा!!!

वरील मजकूर हिंदी चित्रपटातील एखाद्या इमोशनल सीनसाठी लिहिलेली स्क्रिप्ट वाटू शकते. मात्र ही स्क्रिप्ट नसून एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पतीला पाठवलेला शेवटचा व्हिडिओ संदेश आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणारी २३ वर्षीय आयशा आरिफ खान आता या जगात नाहीय. २५ फेब्रुवारीला तिनं साबरमती नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याबद्दलची बातमी अनेक प्रसार माध्यमांमध्ये तुम्ही पाहिली अथवा वाचली असेलच. आयशाचा हा सुसाईड व्हिडीओ देशभर बघितला जात असून हळहळ व्यक्त केली जातेय. अंतःकरणातलं दुःख लपवत, डोळ्यांतले अश्रू रोखत चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करत दाठलेल्या कंठाने आयशानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि हाच तिचा अखेरचा संदेश ठरला. आयशा तिच्या आयुष्याला इतकी कंटाळली कि तिनं मृत्यूला मिठी मारणं पसंत केलं. पैशांसाठी पतीकडून आणि सासरच्यांकडून होणार छळ आणि याच छळामुळे प्रचंड मानसिक तणावात गेलेल्या आयशाला मृत्युशिवाय दुसरा मार्ग सापडलाच नाही. या घटनेनं पुन्हा एकदा हुंडा प्रथा किती खोलवर समाजात रुजलेली आहे याची आठवण करून दिली.

आयशाचे वडील लियाकत अली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं कि, मी तिला खूप रोखण्याचा प्रयत्न केला. तिला 'पवित्र कुराण'ची शपथ दिली, खूप समजावलं मात्र तिनं कुणाचाही ऐकलं नाही. आयशा एक सुशिक्षित तरुणी होती. तिला पीएचडी करून प्रोफेसर बनायचं होतं हे सांगताना तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. केवळ हुंडयारूपी पैशांच्या लालसेमुळे आयशा सारख्या होतकरू तरुणीला आत्महत्या करावी लागते ही गोष्ट संपूर्ण समाजासाठी घातक आहेत. अशा अजून किती विवाहितांना केवळ हुंड्याच्या नावाखाली त्रास दिला जातोय? प्रत्येक दुसऱ्या - तिसऱ्या घरात एक आयशा नक्कीच असेल... पती आणि सासरच्यांकडून हुंड्यासाठी केल्या जाणाऱ्या शारीरिक मानसिक छळाला त्रासली असेल. 

आयशाचा तो व्हिडिओ पाहून मला समाजतल्या या अनिष्ट प्रथांची प्रचंड चीड येते. आपल्याकडे एकतर अहंकाराने माजलेली आणि स्त्रियांना दुय्यम दर्जा देणारी ''पुरुषप्रधान'' संस्कृती. त्यात स्त्रियांनी नेहमी पुरुषांच्या खाली राहावं ही घाणरेडी मानसिकता... आणि याच मानसिकतेमुळे कायद्याने बंदी असलेल्या मात्र तरीही समाजमान्य असलेल्या हुंडा यांसारख्या ''स्त्री - विरोधी'' प्रथा आजही जिवंत आहेत. इथे कायदा कमी पडतो असं मला वाटत. कारण समाजाची असलेली मानसिकता... जर एखाद्या मुलीचे वडील लग्न ठरवताना जावयाला किंवा मुलीच्या सासरच्यांना ''स्त्रीधन'' या नावने दबावाखाली येऊन रोख रक्कम, दागिने, प्रॉपर्टी किंवा अन्य भेटवस्तू देत असतील तर तो हुंडा समजला जातो आणि त्यामुळेच आजही हुंडाप्रथा चालूच आहे. मुलाकडची बाजू वरची आणि मुलीकडची बाजू खालची या मानसिकतेमुळेच हे असले प्रकार घडतात आणि घडत राहतील. काही ठिकाणी कायद्यापेक्षा समाजमन, नैतिकता, मानसिकता या गोष्टी जास्त प्रभावी ठरतात. मी हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही असं प्रत्येकानं ठरवलं तर याठिकाणी कायद्याची गरजच उरणार नाही. 

पण ते म्हणतात ना कि, लातो के भूत  बातो से नही मानते... काहींना कायद्याचा हिसका द्यावाच लागतो. त्यामुळेच १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा आणण्यात आला. या कायद्याच्या कलम 3 नुसार हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे  कारावासाची आणि कमीत कमी रुपये 15,000/- अथवा अशा हुंडयाच्या मुल्याइतकी रक्कम दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र आयशाच्या प्रकरणामध्ये ''मुस्लिम पर्सनल लॉ'' लागू होत असल्याने त्यातील तरतुदींबद्दल माहिती घ्यावी लागेल. पण शेवटी मानसिकता कधी बदलणार हा प्रश्न मला पडतो. त्यात प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जात पंचायती या कायद्यापेक्षा मोठ्या आहेत का? हा प्रश्नही मला पडतो. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना नुकताच राजीनामा द्यावा लागला. राठोड यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी झालेली नाही, सत्य समोर आलेलं नाही. असं असताना पोहरादेवी इथल्या धर्मपीठाच्या महंतांनीही आधीच संजय राठोड यांच्या बाजूनं उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जातीसमूह, त्यांचे प्रमुख, जातपंचायती भारतीय संविधानापेक्षा मोठ्या आहेत का? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. 


शेवटी एवढंच सांगेन - ज्याच्या घरात स्त्री आहे, बहीण आहे त्यानं आधुनिक विचार ठेवून हुंडा देणं - घेणं टाळावं. आपल्या मुलांमध्ये पुरुषी अहंकार न येऊ देता स्त्री - पुरुष समानता रुजवावी. स्त्रियांचा आदर करण्यापासून ते त्यांना बरोबरीचा दर्जा देणं शिकवावं. आधूनिक विचार असलेला मुलगा कधीही हुंडा घेणार नाही आणि आधुनिक विचार असलेली मुलगी हुंडा देणार नाही त्यामुळे हुंडाप्रथा हळूहळू हा होईना नक्कीच संपुष्टात येईल. इंग्रजानांनी १८२९ मध्ये कायदा करून सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. समाजसुधारकांनीही खूप प्रयत्न केले आणि आज सतीप्रथा संपुष्टात आली तशी हुंडाप्रथाही कासव गतीने का होईना पण संपुष्टात नक्की येईल. फक्त एवढंच कि, परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करावी. सर्वांच्या घरातली ''आयशा'' माहेरी सुखी राहावी आणि सासरीही सुखीच नांदावी...

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...